पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात वाॅर्डबाॅयने केला कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग…..

पुणे, २ ऑगस्ट २०२० : पनवेल,अमरावती सारख्या भागात कोरोना काळातही मुलींवर आत्याचार झाल्याच्या घटना या घडल्यानंतर आता पुन्हा एकदा मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आणि ते देखील क्वारंनटाइन सेंटर मधेच , ही घटना माणुसकीला काळीमा फासणरीच आहे.

पुण्यातील हडपसरमध्ये असलेल्या सह्याद्री रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णाचा तेथील वाॅर्डबाॅयनेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयात एक ३५ वर्षीय महिला हि कोरोनावर उपचार घेत होती. जेव्हा आराम करण्यासाठी महिला हि रुम मध्ये गेली असता वाॅर्डबाॅय तिच्या जवळ गेला आणि अश्लील कृत्य करु लागला. या प्रकरणी पोलिसांनी नामदेव गवळी या वाॅर्डबाॅयला अटक केली आहे.

रुग्णालय आणि कोविड सेंटर मधे गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना समोर येत आहे. अमरावतीच्या रुग्णालयात तर एका मुलीच्या गुप्तांगातून कोरोनासाठी स्वॅब घेण्यात आले होते. ज्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ माजला होता. ती घटना ताजी असतानाच आता पुण्यातील सह्याद्री रुग्णालयातून महिलेच्या विनयभंगाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा