बापरे! चहाची किंमत ७०,५०१ रुपये…

आसाम: गोल्डन टिप्स चहा नावाप्रमाणे सोनेरी रंगाच्या पानांचा आहे. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या सर्वांत जुन्या चहाच्या मळ्यांपैकी एक असणाऱ्या मजियान मळ्यातला हा चहा आहे. आसामच्या या चहाच्या मळ्यातला चहाला ७०,५०१ रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. आतापर्यंतच्या चहाच्या दराचा हा विक्रम आहे.
या पूर्वी आसामचाच एक दुसरा चहा – मनोहारी टी जगातला सर्वात मौल्यवान चहा ठरला होता. त्याच्यावर ५०,००० रुपये प्रतिकिलो एवढी बोली लागली होती. गोल्डन टिप्सने या चहाचं रेकॉर्ड मोडलं. गोल्डन टिप्स चहा नावाप्रमाणे सोनेरी रंगाच्या पानांचा आहे. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या सर्वांत जुन्या चहाच्या मळ्यांपैकी एक असणाऱ्या मजियान मळ्यातला हा चहा आहे. गोल्डन टिप्स चहाची पानं हातानं खुडलेली असतात आणि त्याचं ब्र्युइंग खास पद्धतीनं होतं. चहाची रोपं साधारण पन्नास वर्षांनी उखडून टाकली जातात. कारण त्यातलं उत्पादन घटतं, असं म्हणतात पण मजियानच्या या मळ्यात १०० वर्षांपूर्वीची रोपं जपली आहेत आणि त्याचंच उत्पादन आता विक्रमी किंमत देत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा