अंबड, जालना, २१ फेब्रुवारी २०२४ : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंबड जालना रोडवरील पारनेर शिवारात काल संध्याकाळच्या सुमारास पारनेर शिवारातील राष्ट्रीय महामार्ग ७५३ एच वरील मार्गावर पारनेर शिवारात एचपी पंपाच्या अलीकडे असलेल्या दुभाजकावर जाऊन बसचे टायर फुटल्याने बस रोडच्या खाली गेली. या जालना-बारामती बस मध्ये २७ ते ३० प्रवासी असल्याची माहिती चालक मडावी यांनी दिली आहे.
घटना घडल्यानंतर गाडीतील प्रवासी यांना दुसऱ्या गाडीत बसून देण्यात आले. तर काही प्रवासी यांना मुक्का मार लागला असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड बस स्थानकातील बस स्थानक प्रमुख आणि दुरुस्ती विभागाचे पथक क्रेन घटनास्थळी पोहचले. तर रात्री १० ते १०.३० च्या सुमारास बस बाहेर काढून अंबड डेपोमध्ये आणण्यात आली. सदर घटना ही दुभाजकावर दिशा दर्शक फलक व लाईट नसल्याने व चालकाच्या डोळ्यावर समोरून लाईट आल्याने घडली असल्याची माहिती चालक मडावी यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : श्रीधर कापसे