बारामती गणेश भाजी मंडईचे पार्किंग बनले माद्यपीचा तळ

बारामती, १५ फेब्रुवरी २०२१: बारामती शहरात कोट्यवधी रुपयांची विकासाची नवीन कामे सुरू असताना मागे झालेल्या कामांकडे मात्र दुर्लक्ष होते आहे.कोट्यावधी रुपये खर्च करून अद्यावत भाजी मंडई व पार्किंग बांधले आहे. मात्र, बारामती नगर पालिकेचे त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. येथे पार्कींग मध्ये दिवसा मद्यपी नशा करुन पसरलेले दिसतात येथे सगळीकडे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.

बारामती शहर सध्या देशाच्या नकाशावर नावाजले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या श्री गणेश भाजी मंडई मात्र याला पालिकेच्या दुर्लक्षामुळे अपवाद ठरत आहे. श्री.गणेश भाजी मंडई मध्ये प्रवेश करताना कचऱ्याचे ढीग साठले आहेत. तर बाजूने असणाऱ्या शॉपिंग सेंटर मध्ये जिन्यात मोठ्या प्रमाणात कचरा साठला असल्याने येण्या जाण्याच्या जिन्यात दुर्गंधी पसरली आहे.

इमारतीमध्ये अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवली आहे. मात्र, तिची नीट देखभाली अभावी धूळ खात पडली आहे. एखादी दुर्घटना घडल्यावर पालिका प्रशासन त्याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल येथील काही व्यावसायिकांनी केला. तर पालिकेच्या इमारतीची ही अवस्था तर नागरिकांनी आपल्या समस्या कोणाला सांगणार.पालिकेचे कर्मचारी येथे झाडलोट करत नाहीत. मंडईच्या वरती असणाऱ्या प्रशस्त पार्किंग मध्ये तळीराम व वेगवेगळ्या नशा करणारे येथे दिवसा पसरलेले असतात. येथे दारूच्या मोकळ्या बाटल्या व ग्लास चा खच पडला आहे. तर लाखो रुपये खर्च करून बनवलेले स्वच्छता गृहाची तोडफोड केली असुन येथे रात्रभर अनेक अवैद्य प्रकार चालत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव
%MCEPASTEBIN%

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा