अहमदाबाद, १० सप्टेंबर २०२२: गुजरात मध्ये एटीएस ने मोठी कारवाई केली आहे तर २०० किलोचे ड्रग जप्त केले
गिअर बॉक्स मध्ये लपवून दुबईहून हे ड्रग भारतात आणले जात होते
ही कारवाई गुजराती एटीएस आणि डी आर आय ने केली आहे. हे ड्रग फेब्रुवारी महिन्यात दुबईहून कोलकत्ता ला आणलं होतं. त्यानंतर राबवलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली आहे. मागील काही महिन्यापासून गुजरात एटीएस कडून अमली पदार्थ विरोधी कारवाई चालू होती. याच कारवाई मध्ये काही महिन्यापूर्वी केलेल्या कारवाईत अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून आणलेले ड्रग गिअर बॉक्स मध्ये लपवण्यात आले आहे, अशी गुजरात एटीएसला या प्रकरणाची माहिती मिळाली आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली.
यादरम्यान बारा गेअर बॉक्स मध्ये हे ड्रग लपवण्यात आलं होतं. दुबईच्या जेबेल अली पोर्ट वरून हे ड्रग पाठवण्यात आलं होतं. अशी माहिती समोर येत आहे. एटीएस च्या सहा महिन्याच्या तपासानंतर यावर कारवाई करण्यात आली आहे तरी यामध्ये २०० किलो ड्रग गुजरात ATS च्या ताब्यात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे