कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आय एम पी कंपनीत रक्तदान शिबीर

रक्तदान-सर्वश्रेष्ठ दान याला अनुसरून कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील इंडस्ट्रीयल मेटल पावडर्स इंडिया प्रा. लि. व जनकल्याण रक्तपेढी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनीच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात तब्बल ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
राज्यात कोरोनाच्या परिस्थितीत अनेक दवाखान्यात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत होता. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर आय एम पी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश धोका व महेश धोका यांच्या संकल्पनेतुन रक्तदान शिबीर पार पडले.
अवघ्या ४ तासात तब्बल ७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी बोलताना प्रकाश धोका यांनी रक्तदान हे प्रत्येकाने करणे गरजेचे असून यामुळे एखाद्याचा जीव वाचला जाऊ शकतो. भविष्यात आणखी मोठे शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी व परिसरातील कंपन्यांनी देखील सामाजिक जान जपत रक्तदान करावे असे आवाहन यावेळी प्रकाश धोका यांनी केले.
शिबिरात जनकल्याण रक्तपेढी चे डॉ. रमेश कांबळे, रोहीता मुळे, सुनीता थोरवे यांनी रक्तदात्यांना मार्गदर्शन केले. तर सेवाधाम विद्यालयाचे मुख्याध्यापक पवन कट्यारमल, संस्थापक सुभाष कट्यारमल यांच्यासह कंपनीचे अजय गायकवाड, राजीव वैद्य यांनी शिबिराचे नियोजन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा