पंजाबमध्ये भारतीय सीमेत घुसलेले पाकिस्तानी ड्रोन बीएसएफने पाडले

अमृतसर , १४ ऑक्टोबर २०२२: भारत-पाक सीमेवर ड्रोनच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हद्दीतून भारतीय सीमेत घुसलेले ड्रोन बीएसएफच्या जवानांनी पाडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४.३५ वाजता बीएसएफचे जवान रामदास सीमेवर गस्त घालत होते. त्या दरम्यान हे ड्रोन भारतीय हद्दीत घुसले होते, मात्र भारतीय जवानांनी शेजारील देशाची ही चाल यशस्वी होऊ दिली नाही.

या घटनेची माहिती देताना बीएसएफ गुरुदासपूरचे डीआयजी प्रभाकर जोशी म्हणाले की, भारतात प्रवेश करताच सैनिकांनी त्याच्यावर १७ राउंड गोळीबार केला आणि ड्रोन खाली पाडले. ड्रोनच्या एका ब्लेडचे नुकसान झाले आहे. या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा