दिवाळीपूर्वी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई, १ सप्टेंबर २०२२: राज्यात सत्ता बदल होऊन मंत्रिमंडळ अस्तित्वात आले. परंतु दोन महिने लोटल्या नंतरही, अजून संपूर्ण राज्यात कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. यावर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु गणेश आगमनाच्या मुहूर्तावरच भाजप नेते वनमंत्री, सुधीर मुनगंटीवार यांनी दिवाळीपूर्वी दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिली आहे.

याविषयी माहिती देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या विस्तारामध्ये सात कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्र्यांचा समावेश असेल.विस्तारामध्ये शिंदे गटातील काही नेत्यांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी मिळू शकते. मंत्रींमंडळ विस्तार आगामी दोन महिन्यात म्हणजे दिवाळीपूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचा खुलासा ही मुनगंटीवार यांनी केला.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सद्यास्थितीत १९ मंत्र्यांचा समावेश आहे परंतु राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये होईल. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्या मधून १५ टक्केच मंत्र्यांची मर्यादा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ४३ एवढीच राहणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये २६ कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्री असतील असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या विस्तारामध्ये सात कॅबिनेट आणि १७ राज्यमंत्र्यांचा समावेश होणार आहे.

सध्याच्या खातेवाटपात मंत्र्यांना दिलेली खाती, पुन्हा बदलतील याची शक्यता नाही. परंतु त्यातूनही काही खात्यांची आदलाबदल होण्याची दाट शक्यता आहे. असेही मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा