बंगळूर, २६ मार्च २०२३: राज्य सरकारने अनुसूचित जाती-जमाती आणि पंचमसाली लिंगायत समाजाचीही अनेक वर्षांपासूनची आरक्षणाची मागणी पूर्ण केलीय. या समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. २ बी अंतर्गत मुस्लिमांना दिलेलं आरक्षण रद्द करुन त्यांना आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात आरक्षण दिलं जाईल.
पंचमसाली लिंगायत आणि वक्कलिग समुदायाने २ सी श्रेणी अंतर्गत आरक्षणाची मागणी केलीय. ती पूर्ण करण्यासाठी २ सी अंतर्गत वक्कलिगांना ६ टक्के आणि २ डी अंतर्गत लिंगायतांना ७ टक्के आरक्षण दिलं जाईल, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
मंत्रीमंडळाने अनुसूचित जाती-जमातींना अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. अनुसूचित जातींमध्ये आरक्षणाचे लोकसंख्येनुसार चार गटांत वर्गीकरण करण्यात आलंय. गट १ मध्ये आदिजांबव समाजाला ६ टक्के, गट २ मध्ये आदिकर्नाटक समाजाला ५.५ टक्के, गट ३ मध्ये बंजारा, भोवी, कोराचारी यांना ४.५ टक्के आरक्षण आणि गट ४ मध्ये १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर