मारुती सुझुकीला आव्हान, 19 जानेवारीला येणार टाटाच्या या दोन CNG कार

पुणे, 18 जानेवारी 2022: Tata Motors 19 जानेवारी रोजी भारतात त्यांच्या लोकप्रिय मॉडेल Tiago आणि Tigor चे CNG प्रकार लॉन्च करणार आहे. यामुळं, सध्या बाजारात सीएनजी कारचा बोलबाला असलेल्या या सेगमेंटमध्ये कंपनी मारुती सुझुकीशी स्पर्धा करू शकेल. गेल्या वर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळं, आपण अशा पर्यायाच्या शोधात आहोत जो किफायतशीर आहे. त्यामुळं विशेषतः मेट्रो शहरांमध्ये सीएनजी कारची मागणी वाढलीय. सरकार सीएनजी इंधनालाही अधिक प्रोत्साहन देत आहे.

Tata Tiago CNG आणि Tata Tigor CNG

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसारTata Tiago CNG आणि Tata Tigor CNG या कारच्या मानक पेट्रोल मॉडेलवर आधारित असतील. दोन्ही मॉडेल्स फेसलिफ्टेड पेट्रोल डेरिव्हेटिव्ह प्रमाणं असतील. तसेच, टाटा टियागो आणि टिगोरचे वेगवेगळे प्रकार सीएनजी इंधन पर्यायासह लॉन्च केले जातील अशीही माहिती समोर येत आहे.

तथापि, पेट्रोल व्हेरियंट प्रमाणंच सीएनजी प्रकार देखील त्याच इंजिनसह येईल अशी अपेक्षा आहे. हे मॉडेल 1.2-लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिनसह येतात जे 113 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. मात्र, सीएनजी परिवर्तनामुळं पावर मध्ये थोडीशी कपात होऊ शकते. दुसरीकडं, अशी अपेक्षा आहे की ही कार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येईल.

प्री-बुकिंग सुरू

आतापर्यंत टाटा मोटर्सच्या डीलर्सनी या कारसाठी प्री-बुकिंग सुरू केलीय. कंपनी विविध ठिकाणं आणि प्रकारांच्या बुकिंगसाठी 5,000-10,000 रुपये टोकन रक्कम घेत आहे.

मारुती सुझुकीला आव्हान

Tiago CNG आणि Tigor CNG या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी आणि ह्युंदाईला टक्कर देणार आहेत. मारुतीच्या सीएनजी कारची श्रेणी अल्टोपासून सुरू होते. याशिवाय कंपनीच्या WagonR, Celerio आणि Ertiga सारख्या कार देखील CNG प्रकारांसह येतात. Hyundai च्या Santro आणि Aura सारख्या कार देखील CNG प्रकारात येतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा