नवी दिल्ली, ३ ऑगस्ट २०२३ : मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अनेकवेळा गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांकडून लोकसभेत प्रचंड गोंधळ घातला गेला. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे बरेचसे कामकाज गदारोळात वाहून गेले आहे. यावर नाराज झालेले लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात येणार नाही, असा निर्णय घेतला.
ओम बिर्ला यांना पुन्हा सभागृहात परत यावे, अशी त्यांची मनधरणी आज सर्वपक्षीय खासदारांनी त्यांची भेट घेऊन केली, गेल्या काही दिवसांपासून लोकसभेत मणिपूर हिंसाचारावरुन गदारोळ सुरू होता. सभागृहाचे कामकाज होत नव्हते यामुळे ते नाराज झाले होते. ते दोन दिवस सभागृहात आलेच नाही. यानंतर आज लोकसभेच्या काही खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली. लोकसभा अध्यक्ष यांनी परत यावे अशी विनंती केली आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन, बसपचे रितेश पांडे, भाजपचे राजेंद्र अग्रवाल, तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आणि द्रमुकच्या कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर