कोरोनामुळे अमेरिकेत होणारी स्पर्धा रद्द

अमेरिका: सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्यात आतापर्यंत ३ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. याचाच फटका क्रीडा जगतालाही बसला असून कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्षात घेऊन अमेरिकेत सुरु होणारी “इंडियन वेल्स” ही एटीपी मास्टर १००० आणि डब्ल्यूटीएची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
याबाबत स्पर्धेचे संचालक टॉमी म्हणाले की , स्पर्धा रद्द झाल्याने आम्ही खूप निराश आहोत. परंतु स्थानिक नागरिक, चाहते, खेळाडू, स्वयंसेवक, प्रायोजक, कर्मचारी, विक्रेते आणि स्पर्धेत सामील असलेल्या प्रत्येकाचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाची आहे.
कॅलिफोर्नियाच्या आरोग्य विभागाने कोचेला व्हॅलीमध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळेही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. तिथे काही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, इंडियन वेल्स ही स्पर्धा ४ ग्रँडस्लॅम स्पर्धेनंतर महत्त्वाची स्पर्धा मानली जाते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा