लोणी काळभोर,२२ जुलै २०२० : एका दिवसात २४ नागरिक पॉझिटिव्ह आल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली. यामध्ये लोणी काळभोर येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे.
कदमवाक वस्ती ३, लोणी काळभोर १०, शेवळवाडी १, उरुळी कांचन ७, फुरसुंगी १, इत्यादी गावांचा समावेश आहे.
लोणी काळभोर व ऊरुळी कांचन येथील आकडेवारी वाढतच असून लॉकडाऊनच्या काळात सुद्धा नागरिक रस्त्यावर फिरत असताना दिसले व दोन्ही ग्रामपंचायती पावले उचलत असून सुध्दा नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले आहे.
आतापर्यंत लोणी काळभोर येथे ५५ तर उरळीकांचन येथे ९६ कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. रोजच कोरोना बाधित रुग्ण आढळलत असल्याने उरुळी कांचन लोणी काळभोर ग्रामपंचायतीने कडक पावले उचलण्याची गरज आहे.
या रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. असे बोलताना आरोग्य केंद्राचे डॉ. डी. जे. जाधव यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे.