देशात गेल्या २४ तासांमध्ये १०.५ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या कोविड चाचण्या…

नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२०: देशभरामध्ये कोविड-१९ महामारीचा उद्रेक आहे. या रोगाविरुद्ध भारताने आपला लढाही तीव्र केला आहे. या लढ्यामध्ये भारताने आणखी एक महत्वाचा टप्पा ओलांडला असून एका दिवसात आत्तापर्यंत विक्रमी चाचण्या केल्या. देशात गेल्या २४ तासांमध्ये १०.५ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या.
देशात गेल्या २४ तासांमध्ये १०,५५,०२७ जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. भारताने आता दररोज १० लाखांपेक्षा जास्त नमुने तपासण्याची- राष्ट्रीय निदान क्षमता अधिक बळकट केली आहे.
भारतामध्ये आत्तापर्यंत एकूण ४.१४ कोटी (४,१४,६१,६३६) चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोविड-१९ विषयाचा जागतिक संदर्भ लक्षात घेवून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांशी समन्वय साधून भारत सरकारने कोविडविरुद्ध लढा देण्यासाठी ‘टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’ हे धोरण तयार केले आहे. यामध्ये चाचण्या करून संबंधित रूग्णांचे विलगीकरण तसेच आवश्यकतेप्रमाणे उपचार केले जात आहेत. चाचण्या करण्याचे आक्रमक धोरण राबविण्यात येत असल्यामुळे कोविड-१९ ची बाधा झालेल्या रूग्णांना तातडीने उपचार सुनिश्चित केले जात आहेत. तसेच रूग्णांशी कार्यक्षमतेने संपर्क साधून त्यांच्या उपचाराविषयी जागरूकता दाखवून पाठपुरावा केला जात आहे. सौम्य आणि किरकोळ, मध्यम बाधित रूग्णांना घरामध्ये त्वरित अलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच गंभीर रूग्णांना तातडीने रूग्णालयामध्ये भरती करण्यात येत आहे. चाचण्यांचे प्रमाण वेगाने वाढविण्यात आल्यामुळे प्रति दशलक्ष चाचण्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज हे प्रमाण ३०,०४४ आहे.
कोविड-१९ च्या संदर्भामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय योजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष लावले आहेत. यानुसार संशयित कोविड-१९ रूग्णांविषयी सर्वंकष दक्षता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष- प्रतिदिनी १४० पेक्षा जास्त चाचण्या करणे आवश्यक आहे. यानुसार देशात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. अनेक राज्यांनी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त चाचण्या करून चांगली कामगिरी केली आहे.
चाचणी धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्यात आले आहे. आज देशातल्या १००३ सरकारी प्रयोगशाळांमध्ये आणि ५८० खाजगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या, तपासणी होत आहे. तसेच देशभरामध्ये १५८३ ठिकाणी सर्वंकष चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,
यामध्ये, रिअल टाइम रॅपिड टेस्ट आधारित चाचणी प्रयोगशाळा: ८११ (सरकारी ४६३ + खासगी ३४८)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: ६५१ (सरकारी ५०६ + खासगी १४५)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: १२१ (सरकारी  ३४ + खासगी ८७)
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा