मुंबई, दि.३१मे २०२०: लॉकडाऊन सुरू झाला आहे. तेव्हापासून अनेक जण कोणत्या ना कोणत्या रूपाने मदतीसाठी पुढे येत आहे. त्यानंतर प्रत्येकजण अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत मदतीसाठी पुढे आला आहे. ज्यातून एक माणुसकीचा संदेश महाराष्ट्रीयन लोकांनी दाखवून दिला आहे.
त्यातच दादर येथील प्रसाद सावंत हा तरुण जेव्हापासून लॉकडाऊन सूरु झाला आहे. तेंव्हा पासून हा तरुण पोलिसांना हळद दूधचे वाटप करण्याचे काम करतो आहे. याशिवाय या कार्यात त्याची मोठी बहीणही त्याच्या मदतीला येत आहे. जवळपास दोन महिन्यांपासून हा तरुण स्व खर्चातून पोलिसांना हळद दूध देण्याचे काम करतो आहे. त्याच्या हे काम सोशल मिडियावर चांगलेच प्रसिद्ध झाले असून अनेकजण त्याचे कौतुक करीत आहेत.
हे काम करताना तो तरुण सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून काम करीत आहे. त्यामुळे कोणालाही त्रास न होऊ देता तो हे काम करतो आहे. तो करत असलेले काम आदर्शवत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे. शिवाय पोलीस प्रशासनाकडूनही त्याचे कौतुक होत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: