‘या’ राज्यात आता ५०० रुपयांमध्ये मिळणार घरगुती गॅस सिलेंडर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

अलवर (राजस्थान): घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या असल्याने सामान्य जनता संकटात आहे. मात्र आता राजस्थान मधील नागरिकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मालाखेडा येथील सभेला संबोधित करताना, घोषणा केली की, आम्ही एक वर्गवारी तयार करत असून या श्रेणीतील लोकांना १०५० रुपयांचा घरगुती स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर ५०० रुपयांना दिला जाईल. राज्यात एप्रिलपासून सिलिंडर उपलब्ध होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच पुढील महिन्यात आम्ही अर्थसंकल्प सादर करणार असून, या अंतर्गत महागाईचा भार कमी करण्यासाठी स्वयंपाकघरातील किट वाटपाची योजना सुरु होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • आगामी अर्थसंकल्प युवक आणि विद्यार्थ्यांना समर्पित!

पुढे ते म्हणाले, राजस्थानचा आगामी अर्थसंकल्प तरुणांना समर्पित असेल. या बजेटमध्ये त्यांच्यासाठी अनेक खास गोष्टी असतील. त्याचवेळी गॅस सिलिंडरच्या किमतीवर मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला ५०० रुपयांना सिलिंडर मिळणार असल्याचे सांगितले. गॅस सिलिंडरवर राज्य सरकार सबसिडी देणार आहे. ते पुढे म्हणाले की, आगामी अर्थसंकल्प राज्यातील जनतेसाठी विशेष असेल. तज्ञ अजूनही संशोधनात गुंतलेले आहेत. सर्व जनतेला लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल.

  • मोदींना आश्वासनांचा विसर

मोदींना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला आहे, पण आम्ही दिलेले आश्वासन ते पूर्ण करत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, भाजपचे नेते शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करतात, मात्र आम्ही शेतकर्‍यांसाठी सातत्याने काम करत आहोत, हे वास्तव आहे. त्याला पैसेही दिले. यासोबतच वीज बिलातही दिलासा मिळाला आहे. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आज एक कोटी लोकांना पेन्शन दिली जात आहे. कोरोनावर मोफत उपचार करण्यात आले. सर्वांची मोफत तपासणी करण्यात आली.

येत्या काळात अनेक बदल पाहायला मिळतील.याशिवाय इतरही अनेक निर्णय घेतले जाणार आहेत. याबाबत बोलताना गेहलोत म्हणाले की, आज राज्यात ११ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. सरकार सातत्याने नोकऱ्या देत आहे. राजस्थान हे देशातील एकमेव राज्य आहे, जे गांधीजींचे नाव आणि विचार समोर ठेऊन लोककल्याणाच्या दिशेने सातत्याने काम करत असल्याचे गेहलोत यांनी म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा