पुरंदर, दि. २० जून २०२०: सासवड नगरपरीषदेच्या आरोग्य विभागासाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या आमदार निधीतून औषध फवारणी मशीन देण्यात आली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळीचा भाग निर्जंतुक करण्यासाठी अशा प्रकारच्या मशीनची मागणी करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या मशीनचे पूजन करून आज ती नगर परिषदेला सुपूर्द करण्यात आली.
यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, मुख्याधिकारी विनोद जळक, नगरसेवक अजित जगताप, सुहास लांडगे, विजय वढणे, संजय ग जगताप, मनोहर जगताप, संदीप जगताप, दीपक टकले, सचिन भोंगळे, यशवंतराव जगताप, नंदू जगताप, राजेंद्र गिरमे तसेच सुदाम इंगळे, विठ्ठल झेंडे, शिवाजी पोमण, विराज काकडे, राहुल गिरमे आदी उपस्थित होते. या मशीनची क्षमता ६०० लिटर असून याद्वारे सोडियम हापोक्लोराइड तसेच जंतुनाशक, तणनाशक या औषधांच्या फवारणीसह जंतुनाशक पावडर धुरळणीही करता येते असे पालिकेचे आरोग्यप्रमुख मोहन चव्हाण यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे