डीएसकेंना स्वतःच घरही भाड्याने मिळेना

पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डीएसकेंना स्वत:चेच घर भाड्याने मिळणे देखील कठीण झाले आहे. स्वतःतचेच घर भाडयाने देण्याची डिसकेंची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि.१४) रोजी फेटाळली. मात्र आपल्या या मागणीसाठी अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले आहेत.ईडीने बाजारभावानुसार या बंगल्याचे ११ लाख रुपये भाडे द्यावे, अशी मागणी डीएसकेंकडे केली होती. त्यानंतर हा बंगला भाडयाने द्यावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे करण्यात आली होती. परंतु पुणे सत्र न्यायालयाने डीएसकेंना याबाबत निर्णय घेण्यासाठी १० दिवसांची मुदत देखील दिली होती. ही मुदत २५ सप्टेंबर रोजी संपताच तपास यंत्रणेने हा बंगला ताब्यात घेतला.
त्याविरोधात डीएसकेंनी उच्च न्यायालयात धाव घेत याप्रकरणी अपील केले. न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने यावर आदेश न देता याचिकाकर्त्यांना लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश देत याचिका निकाली काढली.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यातील स्वत:चेच घर आपल्या कंपनीला भाडयाने देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यासाठी त्यांनी ११ लाख रुपये भरण्याची तयारीही दाखवली होती. मात्र कायद्याच्या तरतुदीत ही बाब बसत नसल्याचे कारण देत न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा