श्रेयस व किशनच्या दमदार खेळीमुळे भारताने आफ्रिकेवर साकारला दणदणीत विजय

पुणे, १० ऑक्टोबर २०२२ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एक दिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा एक दिवसीय सामना भारताने ७ विकेट्स राखून जिंकला आहे. हा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

कालच्या सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली, सलामीविर क्विंटन डी कॉक ( ५) आणि मलान (२५ ) धावांच्या पुढे जाऊ शकले नाही. पण त्यानंतर एडन मक्रम आणि रीझा हेड्रीक्स या दोघांनी मिळून दमदार अशी खेळी करत शतकीय भागिदारी केली. रिझाने ७४ तर मक्राम ने ७९ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. हॅन्ड्रिक्स बाद झाल्यानंतर आलेल्या क्लासने यांनी आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही बाद झाला. यानंतर डेव्हिड मिलर आणि पार्नेल खेळपट्टीवर आले मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या दहा षटकात टिच्चून मारा करत या दोघांना हात उघडण्याची संधी दिली नाही. क्लासेस (३०) तर मिलर नाबाद (३५) धावांच्या योगदानाच्या जोरावर संघाची धावसंख्या २७८ पर्यंत नेली.

विजयासाठी मिळालेल्या २७९ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला सुरुवातीलाच दोन धक्के लवकर बसले, कर्णधार शिखर धवन १३ व शुभमन गिल २८ धावा करून लवकर बाद झाले, पण त्यानंतर श्रेयस आणि ईशान किशन यांनी भारताची धावगती चांगलीच वाढवली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी रचली, आणि भारतीय संघाला विजयाचा मार्ग दाखवला. टीम इंडियाकडून ईशान किशन ९३ धावांची तुफानी खेळी केली, तर श्रेयस आयरने त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीमधील सर्वोच्च खेळी करत १११ चेंडूत नाबाद ११३ धावांची खेळी केली. त्याचबरोबर संजू सॅमसन च्या नाबाद ३० धावांच्या जोरावर भारताने हा सामना सात विकेट्सने जिंकला. या सामन्यातील विजयमुळे भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी घेतली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णयक एकदिवसीय सामना ११ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत खेळला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा