माळेगाव, १८ सप्टेंबर २०२०: माळेगाव राष्ट्रीय पोषण माह निमित्य एकात्मिक बालविकास सेवा योजना बारामती प्रकल्पातील माळेगाव बुद्रुक येथील अंगणवाडी केंद्रात शासनाने दिलेल्या कोविड चे सर्व नियम पाळून सोशल डीस्टंन्सिंग ठेऊन आज रोजी बालकांचे वजन व उंची मोजण्यात आली तसेच अंगणवाडी बिट पर्यवेक्षिका व सेविका यांनी केलेल्या सर्वेक्षणात काही बालकांचे उंची नुसार वजन कमी आहेत.अश्या बालकांना कोणता सकस आहार देणे गरजेचे आहे.याबाबत मार्गदर्शन केले त्यांच्या पाल्यांना घरपोच आहाराचे वाटप वेळच्या वेळी केले जाईल या बाबत सूचना दिल्या.अंगणवाडीतील बालकांचे पोषण काळजी, लवकर स्तनपान,योग्य आहार आणि योग्य वेळी आहार यावर योग्य व सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
एकही बालक आहारापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊन घरपोच आहार देणे बाबत सूचना देण्यात आले.तसेच कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण करून एकाद्या व्यक्तीला सर्दी,ताप, खोकला इत्यादी लक्षणे दिसून आल्यास त्यांना माहिती देऊन वरिष्ठांना व प्राथमिक आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपर्क साधून माहिती देणे त्यांना योग्य उपचार देणे एकही बालक आहारापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊन घरपोच आहार देणे बाबत सूचना देण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव