कराचीत इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, शारजाहून हैदराबादला येत होते विमान

कराची, १७ जुलै २०२२: इंडिगो विमानाचे पाकिस्तानातील कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे विमान शारजाहून हैदराबादला जात होते, असे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे विमान उतरवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर क्रू मेंबर्सनी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांना दुसऱ्या विमानाने हैदराबादला आणले जाईल. दोन आठवड्यांत कराचीमध्ये भारतीय विमानाचे हे दुसरे आपत्कालीन लँडिंग आहे.

इंडिगो एअरलाइन्सने म्हटले आहे की शारजाह-हैदराबाद फ्लाइटच्या पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. यानंतर खबरदारी म्हणून विमान कराचीच्या दिशेने वळवण्यात आले. सध्या प्रवाशांना हैदराबादला आणण्यासाठी कराचीला जादा विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

स्पाइसजेटचे 5 जुलै रोजी कराचीत इमर्जन्सी लँडिंग झाले होते

स्पाईसजेटच्या विमानात बिघाड झाल्यानंतर ५ जुलै रोजी कराचीमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून दुबईला जात होते. या बिघाडानंतर विमानाला पाकिस्तानातील कराची येथे उतरावे लागले. स्पाईसजेटच्या दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दुबईला नेण्यात आले.

याप्रकरणी डीजीसीएचेही वक्तव्य आले आहे. असे सांगण्यात आले की स्पाइसजेट विमानाच्या क्रूच्या लक्षात आले की इंधन टाकी इंडिकेटर इंधनाचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. यानंतर तपासणीत काहीही चुकीचे आढळून आले नाही, टाकीमध्ये कोठूनही गळती झाली नाही. पण इंडिकेटर अजूनही कमी इंधन दाखवत होता. त्यामुळे विमान कराचीत उतरवण्यात आले.

१४ जुलै रोजी जयपूरमध्ये इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंगही करण्यात आले होते

तीन दिवसांपूर्वी जयपूरमध्ये इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. इंजिनला कंपन आल्यानंतर हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा