नवी दिल्ली, १ ऑक्टोंबर २०२३ : १९व्या आशियाई खेळांचा आज ८ वा दिवस आहे. आजही भारतीय खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. या खेळांच्या सातव्या दिवशी भारताने दोन सुवर्णांसह पाच पदके जिंकली. आता आठव्या दिवशी भारताला गोल्फमध्ये पदक मिळाले आहे.
आज भारतीय गोल्फर अदिती अशोक हिचे सुवर्णपदक हुकले असून, तीला रौप्यपदक मिळाले आहे. शनिवारी खेळ संपेपर्यंत आदिती तीन फेऱ्यांनंतर आघाडीवर होती. पण ती आज सातत्य राखू शकली नाही. तिच्यामुळे आज भारताला रौप्य पदक मिळाले आणि सांघिक स्पर्धेत भारत चौथ्या स्थानावर राहिला. अदिती अशोकने आज इतिहास रचला असून गोल्फमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
भारताने १० सुवर्ण, १५ रौप्य आणि १४ कांस्य अशी एकूण ३९ पदके जिंकली आहेत. आज शूटिंग इव्हेंटचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात सर्वाधिक सुवर्णपदके नेमबाजीतून आली आहेत. ८व्या दिवशी बॅडमिंटनमधील सुवर्णपदकाच्या सामन्यावरही भारताची नजर असेल, जिथे भारताचा सामना चीनशी होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड