विराट कोहलीने केपटाऊनमध्ये राष्ट्रगीताचा केला अपमान, फॅन्स नाराज

केपटाऊन, 25 जानेवारी 2022: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली (VIRAT KOHLI) त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी त्याचे हे लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. सामन्यापूर्वी तो राष्ट्रगीतादरम्यान च्युइंगम चघळताना दिसला होता. ज्याचा व्हिडिओ पाहून चाहते त्याला ट्रोल करत आहेत.

विराट कोहलीने केपटाऊनमध्ये राष्ट्रगीताचा केला होता अपमान

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना केपटाऊनमध्ये खेळवला गेला. जिथं भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (VIRAT KOHLI) यानं अतिशय लज्जास्पद कृत्य केले आहे. कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात असलेल्या विराटनं राष्ट्रगीताचा अपमान केला. वास्तविक, जेव्हा भारतीय राष्ट्रगीत वाजत होतं, त्यावेळी कोहली च्युइंगम चघळताना दिसला होता.

तर इतर खेळाडू राष्ट्रगीताचा आदर करताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे चाहते खूप दु:खी झाले होते. यापूर्वी परवेज रसूलनंही असंच काहीसं केलं होतं. आता चाहते सोशल मीडियावर विराट कोहलीविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा