माढा ११ फेब्रुवारी २०२१ : शेतकर्यांनी जमीन सशक्त बनवून फेरपालटीची पिके घेतली पाहीजेत, असे मत राम बायोटेकचे डाॅ राजेंद्र पाटील यांनी मांडले.ऊजनी(टें) येथे केळी विषयाच्या पिकाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. जळगाव येथील राम बायोटेक ऍग्रो कंपनीच्या वतीने परिसंवाद घेण्यात आला होता. यावेळी डॉ.पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी जमिनीचा कस राखण्यासाठी सेंद्रिय व जैविक पद्धतीचा खतांमध्ये वापर केला पाहिजे.
रासायनिक खतांचा मात्रा कमी करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय खते व जैविक खते शेतीला दिले पाहिजेत. यावेळी राज्य कृषिमूल्य आयोगाचे मा सदस्य प्रा.सुहास पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी पिके घेण्यापूर्वी हिरवळीची खते व उसाचे पाचट जमिनीमध्ये बुजवले पाहिजे.या प्रक्रियेमुळे जमीन कसदार बनून पिकांचे चांगले उत्पादन तयार होईल.ऊजनी बॅक वॉटर परिसरातील जमीनींमध्ये जादा पाणी वापरामुळे क्षारपड होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. ्यामुळे शेतकर्यांनी जीवामृत स्लरी, जैविक खते व रासायनिक खतांचा कमीत कमी वापर या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. या कार्यक्रमासाठी उजनी व आढेंगाव येथील शेतकरी उपस्थित होते.यावेळी सुरेश पाटील, अमोल पाटील, बाबासाहेब पाणबुडे, सचिन गायकवाड, कालिदास शिरतोडे,जोतीराम मेटे,योगेश वायकर, परमेश्वर मेटे,बापु कवडे,आदी केळी ऊत्पादक शेतकरी ऊपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील