मोढवे गावच्या परिसरातील खडी मशिनवर कारवाई करण्यासाठी उपोषण

बारामती, २ फेब्रुवरी २०२१: तालुक्यातील मोढवे गावच्या परिसरामध्ये तीन खडी मशिन सुरू असुन खड़ी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे मोढवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे व जागोजागी खड्डे पडले आहेत.त्यामुळे मोढवे ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्या भागातील जमिनी खडीमशिन मुळे परिसरात धुळ होऊन त्या भागातील शेती नापिक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

मोढवे ग्रामस्थांनी याभागात केल्या जाणाऱ्या स्फोटामुळे घरांना मोठे तडे गेलेले आहेत. तर शेतामध्ये काम करीत असताना परिसरात उडणाऱ्या धुळीमुळे शेतात काम करणेही अवघड झाले आहे. याबाबत तहसीलदार विजय पाटील व उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे, प्रदूषण नियामक मंडळ याना वेळोवेळी नेवेदन देऊन देखील कोणतीही कारवाई होत नसल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले तर स्फोटामुळे परिसरामध्ये पाण्याची पातळी घटली आहे.

आम्ही कसे जगायचे आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असुन या त्रासामुळे गाव सोडण्याची वेळ येवू नये अशी भिती शेतकऱ्यांना वाटत असल्याने या खडी मशीनवर कारवाई करावी यासाठी आज मंगळवारी प्रशासन भवन समोर ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा