नागपुरात कोविड रुग्णालयाला आग, ३ रुग्णांचा मृत्यू

नागपुर, १० एप्रिल २०२१: राज्यातील सर्वात संसर्गित शहरांपैकी नागपूर एक आहे. नागपूर मध्ये देखील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशातच काल नागपुर मधील वाडी मध्ये एक कोविड रूग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग लागली. वेल स्ट्रीट असे या रुग्णालयाचे नाव आहे. आग लागल्यामुळे रुग्णालयात गोंधळ उडाला. या भीषण आगीत ३ रुग्णांचा जळून मृत्यू झाला आहे तर इतर रुग्णांना इतरस्त हलवण्यात आले आहे.

आग लागताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या तसेच उच्च स्तरीय अधिकारी दाखल झाले. आग लागलेल्या रुग्णालयातून २७ रुग्ण इतर ठिकाणी हलवण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांनी सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३ मृतदेह आणण्यात आले आहेत.

आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, ही आग एसीमधून निघताना पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर रूग्णालयात आग लागण्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. आपल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याचबरोबर या अपघातात जखमी झालेल्यांनीही लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा