मुंबई, २० जून २०२१: अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये प्रचंड घसरण झाल्याने कंपनीचे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती एका आठवड्यात १४.१ अब्ज डॉलर्स जवळपास १,०४,५४३ कोटी रुपयांनी घसरली आहे. परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स (एफपीआय) अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक केल्याच्या बातमीमुळे गौतम अदानींच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये संपूर्ण आठवड्यात घसरण झालेली पाहण्यास मिळाली.
गेल्या आठवड्याच्या शुक्रवारी शेअर बाजार बंद होता, तेव्हा गौतम अदानी यांचं नेटवर्थ ब्लूमबर्ग बिल्लेनियर निर्देशांकानुसार ७७ अब्ज डॉलर्स (सुमारे ५,७०,९०९ कोटी रुपये) होती. परंतु या आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर गौतम अदानी यांची संपत्ती ६२.९ अब्ज डॉलरवर गेली आहे (सुमारे ४,६६,३६६ कोटी रुपये). स्टॉक मार्केटमधील अदानींच्या शेअर्समध्ये घसरण केल्यामुळं गौतम अदानींची नेटवर्थ खूपच खाली गेलीय.
एक बातमी आणि शेअर ढासळले
या संपूर्ण आठवड्यात गौतम अदानींच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. सोमवार ते शुक्रवार या काळात अदानी ग्रुपच्या शेअर्सची अवस्था वाईट झाली होती. सोमवारी अशी माहिती मिळाली की नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ने तीन परदेशी फंडांची खाती सील केली आहेत. या फंडांनी अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये ४३,५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळं सोमवारी अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स घसरणीला लागले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे