मद्यपींसाठी खुशखबर ! सरकारने दारुवरील एक्साईज ड्युटी 50 टक्क्यांनी घटवली

मुंबई, 21 नोव्हेंबर 2021: राज्यातील मद्यप्रेमींसाठी महागाईच्या काळात दिलासा देणारं वृत्त आलं असून राज्यातील ठाकरे सरकारने दारुवरील एक्साईज ड्युटी घटविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.

स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. “स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली” अशी एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

अधिका-याने सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीतून सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, कारण त्यामुळे एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढेल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा