वाघोली, २३ डिसेंबर २०२०: दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून आंदोलनास बसलेल्या शेतकरी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी पद्मभूषण मा. श्री. अण्णासाहेब हजारे यांनी आव्हान केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी एकदिवसीय ठीया आंदोलन करूण शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
त्याप्रमाणे महागणपती रांजणगाव गणपती येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास राळेगणसिद्धी संयोजक शिवाजीराव खेडेकर यांच्या माध्यमातून एक दिवसीय ठिकाण आंदोलन करण्यात आले. त्यासाठी माहिती सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वानखडे, जरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार, यांच्याबरोबर अनेक सहयोगी संस्थांनी पाठींबा दिला.
शेतकर्यांचा विरोध असलेल्या कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे, स्वामिनाथन आयोगाने केलेल्या सुचना प्रमाणे सरकारने शेतकर्यांना सहकार्य केले पाहिजे, शेतकरी जगला तरच देशाला अन्न मिळणार आहे. त्यामुळे भारत सरकारने शेतकर्यांच्या संदर्भात निर्णय घेताना शेतकर्यांना विश्वासात घेतले पाहिजे अश्याप्रकारचे मत शेतकरी नेते विठ्ठल पवार यांनी मांडले.
सदर आंदोलनासाठी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे संघटक शिवाजीराव खेडेकर, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार, समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गव्हाने, माहिती सेवा समितीचे शिरुर तालुका अध्यक्ष संतोष काळे, उपस्थित होते.
लवकरच महाराष्ट्रातील माहिती अधिकारात काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक घेऊन आंदोलनास मोठ्याप्रमाणात पाठींबा देण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे शिवाजी खेडेकर यांनी बोलताना सांगितले.
दिवसभरात हजारो नागरिकांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला व सर्व नागरिकांनी कायद्यात दुरुस्ती करणेकामी शेतकर्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले आहे.
नियमाप्रमाणे संध्याकाळी ५ वाजता आंदोलन समाप्त करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे