अकोल्यात गृहमंत्री अमित शहांची आढावा बैठक, लोकसभेसाठी रणनीती

अकोला ५ मार्च २०२४ : कार्यकर्ता ही भाजपाची ताकद असून कार्यकर्त्यांची भेट घेतल्यामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. आपण पक्ष विस्तारासोबत देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाईक म्हणून कार्यरत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या लोकसभा मतदारसंघातील भाजपा संचालन समिती व पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक लोकसभा पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते. अकोला बाळापुर रोड वरील हॉटेल ग्रँड जलसा इथे हा कार्यक्रम संपन्न झाला. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर उपस्थित होते.

सकारात्मक पद्धतीने भाजपा निवडणूक लढत असून भारतीय जनता पक्षाला जनतेच्या मनातला लोकनेता प्राप्त झाला आहे. प्रत्येक वार्डात प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा भाजपाचा कार्यकर्ता असल्यामुळे पक्ष २०२४ ची निवडणूक जिंकणारच आहे, परंतु भारतीय जनता पक्ष २५ वर्षाचे लक्ष घेऊन कार्य करत आहे. येणाऱ्या पिढीला अजून चांगलं काम करता यावं यासाठी भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. पक्षाने ४० दिवस ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्याला दिलेलय आहेत त्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडा. लाभार्थी तसेच समाजातील सर्व घटकांना एकत्रित करण्याचं काम करा. असे मंत्र शहांनी कार्यकर्त्यांना दिलाय.

लोकांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची असून त्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी जनतेशी कल्पकतेने संवाद साधा. शतप्रतिशत भाजपा निर्माण करण्यासाठी कामाला लागा. पार्टीच्या विस्तारासाठी काम करणाऱ्या लोकांची गरज असून विचारांच्या लढाईसाठी सर्व समाजातील लोकांना पक्षाशी जोडा. आपण राष्ट्र निर्माणसाठी पक्षाच्या विस्तारासाठी आपल्या क्षेत्रातील मतदान मोठ्या प्रमाणात होण्यासाठी कामाला लागा असे आवाहन अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : शाहिद इकबाल

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा