मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, चौदाजण जखमी

रायगड, ८ सप्टेंबर २०२२: जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर हमरापुर फाटा ब्रीजवर अपघात झाला. आज पहाटे दोन वाजता टेम्पो व ट्रेलरमध्ये अपघात झाला असून टेम्पोमधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एकूण २२ प्रवासी होते. कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना हा अपघात झाला आहे.

टेम्पो MH 43 BP 0756 खेडवरुन मुंबई सांताक्रूझकडे जात होता. यावेळी पेण हमरापुर ब्रीजवरील बंद पडलेल्या ट्रेलर MH 46 AR 0074 ला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात जखमींमध्ये चालक सागर दिलीप गुरव वय ३१, प्रतिभा देवले, रंजना भुवड, यांची अवस्था चिंताजनक आहे.

बाकीच्या सर्व अपघातग्रस्तांना कल्पेश ठाकूर यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून तत्काल पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा