फलटण दि. २२ जून २०२३ : महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतत धडपडत असतात. पोलीस 24/7 काम करत असताना निवाऱ्याची व्यवस्था महत्वाची असते. आपण पोलिसांना आधुनिक व सुसज्ज इमारती उभारणार अत्याधुनिक तंत्रज्ञान व नवीन इमारती उभारणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बरड तालुका फलटण येथे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेणे व फलटण शहर, ग्रामीण पोलीस स्टेशन, वाठार स्टेशन, येथील तीन नव्या अत्याधुनिक इमारतींचा भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. या वेळी पालकमंत्री शंभुराजे देसाई, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आमदार प्रवीण दरेकर, अर्चना त्यागी पोलीस महनिरिक्षक सुनील फुलारी, सातारा पोलीस प्रमुख समीर शेख, यांच्या सह पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
अनेक इमारती जीर्ण झालेल्या असल्यामुळे आज आपण नवीन इमारती बांधत आहोत नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इमारती बांधल्या जानार आसून पोलिसांच्या घरांचा प्रश्न ही मार्गी लावला जाईल असे आश्वासन उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर केली आहेत. अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या प्रश्न कमी वेळेत सोडवले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघा संकल्पनासाठी विकासासाठी व वेगवेगळ्या योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी प्रयत्नशील आहे . माढा लोकसभा मतदारसंघा साठी कोट्यावधी रुपयांची कामे दिली जातील असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या वेळी पालकमंत्री शंभुराजे देसाई, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाषण केले.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल व रुक्मिणी च्या मूर्तींचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने पोलीस, अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार