पुणे,२ जून २०२३ : पुण्यात कोयता टोळीचा उच्छाद थांबायचे नाव घेत नाही. पुणेकर या दहशतीला कंटाळलेले असतानाच आता हे लोन घरापर्यंत पोहोचले आहे. पुण्यातील मार्केट यार्ड येथील पती-पत्नीने कोयत्यावरून एकमेकावर वार केल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे. सुवर्णा मुकेश राऊत,वय २९ आणि मुकेश अशोकराव राऊत,वय ३६ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा मुकेश राऊत आणि मुकेश अशोक राऊत हे दोघेही पती-पत्नी असून ते मार्केटयार्ड परिसरातील स्वप्नपूर्ती सोसायटीत राहत आहे. २९ जून रोजी पती- पत्नीमध्ये घरातील कोयत्यावरून वाद झाला. सुवर्णा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी पती मुकेश राऊत यांना सांगितले की, तू कोयता कुलकर्णी यांना द्यावा व नाही दिल्यास तो माझ्या कामात येईल अशी पत्नीने विचारना का केली या रागातून पतीने पत्नीला हाताने मारहाण करून तिच्या डोक्यावर कोयत्याने मारून डोके फोडून तिला जखमी केले.
तर मुकेश राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते राहत्या घरी असताना, पत्नी त्यांना म्हणाली, तुम्ही घरातील कोयता विकत का नाही याकारणावरून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर तिने कोयत्याने मारून त्यांना जखमी केले. तसेच त्यांना खाली पाडून हाताने आणि लाथानी मारहाण करून शिवीगाळ केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर