नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२२: अमेरिकन सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी परत येताच चीनने तैवानला घेरले आहे. एवढेच नाही तर चीनने तैवानला लागून असलेल्या भागात लष्करी सरावही सुरू केला आहे. या सरावासाठी चीनकडून अनेक युद्धनौका, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर चीनचे नौदल तैवान सीमेपासून केवळ ९ नॉटिकल मैलांवर लष्करी सराव करणार आहे. त्यामुळं तैवानला धोका वाढत आहे. दुसरीकडं अमेरिकेनेही चीनला नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीला संकटात बदलू नका, असा इशारा दिलाय.
वास्तविक, नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळं चीन संतापला आहे. याआधीही त्यांनी अमेरिकेला हा दौरा पुढं ढकलण्यास सांगितले होतं. तसेच, तैवानला गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी देण्यात आली होती. आता नॅन्सी पेलोसी परत येताच चीनने समुद्रात लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. चीनचं हे पाऊल युद्धाला चिथावणी देणारे मानलं जात आहे. खरं तर युक्रेनने नाटोचे सदस्यत्व जाहीर केले तेव्हा रशियानेही अशाच प्रकारे लष्करी सरावाच्या नावाखाली सीमेवर सैन्य पाठवलं होतं. यानंतर फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला झाला होता. दुसरीकडं व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जीन-पियरे यांनी बुधवारी सांगितलं की, चीनने नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीला संकटात बदलू नये.
याआधी बुधवारी चीनने तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात २७ लढाऊ विमानं पाठवली होती. यापैकी २२ विमानांनी मध्यवर्ती रेषा ओलांडली होती, जी दोन्ही देशांमधील अघोषित सीमा होती. एवढंच नाही तर चीनने तैवानच्या आजूबाजूच्या सहा ठिकाणांहून हवाई आणि समुद्रात सराव करण्याची घोषणा केलीय. चीनला तैवानसमोर आपली ताकद दाखवायची आहे, असं मानलं जातं.
पेलोसी यांनी चीनला कडक संदेश दिला
नॅन्सी पेलोसी यांनी त्यांच्या तैवान भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन यांची भेट घेतली. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की अमेरिका तैवानच्या लोकशाहीचं रक्षण करेल. तैवानला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करेल. पेलोसी यांनी त्यांच्या भेटीदरम्यान लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांची भेट घेतली. यात Caixi यांचा समावेश होता, जे १९८९ च्या तियानमेन स्क्वेअर निषेधादरम्यान विद्यार्थी नेता होते. जे २०१९ मध्ये हाँगकाँगला गेले. दुसरीकडं अमेरिकेने चीनला तैवानवर लष्करी कारवाई न करण्याची धमकी दिलीय.
दुसरीकडं, नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याबाबत संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले, आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आमसभेच्या ठरावांनुसार आम्ही चीनच्या वन चायना धोरणाला पाठिंबा देतो.
तैवानबाबत अमेरिकेचं धोरण काय आहे?
चीन तैवानला आपला भूभाग मानतो. तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश म्हणून वर्णन करतो. दुसरीकडं, अमेरिकेचे तैवानशी अधिकृतपणे राजनैतिक संबंध नाहीत. तो चीनच्या वन धोरणाचे समर्थन करतो. पण अमेरिका त्याला तैवान संबंध कायद्यानुसार शस्त्रे विकते. तैवानच्या स्वसंरक्षणासाठी अमेरिका आवश्यक ती मदत करेल, असं या कायद्यात म्हटलंय. अशा स्थितीत नॅन्सी पेलोसी यांच्या तालिबानच्या भेटीकडे चीन थेट वन चायना धोरणाला आव्हान म्हणून पाहत आहे. ही भेट शस्त्रास्त्रे हाती घेण्याचे कारणही ठरू शकते, अशी धमकीही चीनने दिलीय.
चीनने धमकी दिली, त्यानंतर तैवानने प्रत्युत्तर दिले
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने नॅन्सीच्या भेटीबाबत म्हटलं की, अमेरिकेची भूमिका आगीशी खेळण्यासारखी आहे. ते खूप धोकादायक आहे. जे आगीशी खेळतात ते स्वतःला जाळून घेतात. दुसरीकडं, तैवाननेही युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. यावेळी तैवानला अमेरिकेचा थेट पाठिंबा मिळत आहे. यामुळंच तैवानही चीनला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची धमकी देत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे