नवी दिल्ली, २२ मार्च २०२१: काही दिवसांपूर्वी पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे विषयी आदेश देण्यात आले होते. यानंतर सरकारने याच्या मुदतीत अनेक वेळा वाढ देखील केली. मात्र, तरीही जर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल तर ३१ मार्चपर्यंत ते करून घेणे गरजेचे असणार आहे, अन्यथा तुम्हाला बँकेविषयी कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. अद्याप सरकारकडून यात मुदतवाढ करण्या विषयी कोणतीही सूचना आलेली नाही.
बँक खाते उघडणे, म्युच्युअल फंड किंवा समभाग खरेदी करणे आणि ५०,००० पेक्षा जास्त रोख व्यवहार करणे अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.
भरावा लागणार दंड
अंतिम मुदतीपूर्वी आपण दोन्ही डॉक्युमेंट कनेक्ट करण्यास अयशस्वी झाल्यास आणि आपला पॅन निष्क्रिय झाला, तर असे गृहित धरले जाईल की आपला पॅन कायद्यानुसार फर्निस्ड नाही आणि इनकम टॅक्स कायद्याच्या कलम २७२ बी नुसार तुम्हाला १०,००० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
कसे कराल लिंक
आपला पॅन आधारशी जोडण्यासाठी इनकमिंग टॅक्स विभागाच्या ई-फाईलिंग पोर्टलला भेट द्या.
– डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार सेक्शनवर क्लिक करा.
– आपला पॅन नंबर, आधार क्रमांक आणि नाव भरा.
– कॅप्चा भरा.
– ‘Link Aadhaar’ ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा पॅन आधार लिंकिंग पूर्ण होईल.
– आयटी विभाग आपले नाव, जन्म तारीख आणि लिंग आपल्या आधार तपशीलांच्या विरूद्ध वैध करेल, त्यानंतर लिंक होईल.
एसएमएसद्वारे पॅनला आधारशी लिंक कसे कराल?
जर आपण आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाईटद्वारे आपला पॅन आणि आधार लिंक करण्यास सक्षम नसल्यास आपण एसएमएसद्वारे आपल्या पॅनला आधार क्रमांकाशी लिंक करू शकता. यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन ५६७६७८ किंवा ५६१६१ वर एसएमएस पाठवा. हे करण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN (१२ अंकी आधार क्रमांक) (१० अंकी पॅन) टाईप करा आणि ते ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवावे
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे