माझी जेल मध्ये जाऊन राहायची तयारी आहे. मला गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका : प्रकाश आंबेडकर.

अकोला २७ जुलै २०२०: यंदा कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. याच परिस्तिथी मध्ये सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. तसेच पोटा पाण्यासाठी सर्व सामान्य लोक बाहेर येत आहेत आणि सरकार आम्ही कारवाई करू असे आवाहन करत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन वाढीचा जोरदार विरोध केला आहे.

सरकारने ३१ जुलै नंतर पुन्हा लॉक डाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. यावेळी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेल मध्ये जाऊन राहायची तयारी आहे. असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले.”आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आता आम्हाला फक्त लॉकडाऊन मोडावा लागेल, दान दात्यांची क्षमता आता संपलेली आहे. शासनाने मदत करावी .सरकार गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवत आहे. परंतु सर्वसामान्यांचे हाल होत आहे. म्हणून सरकारने ३१ जुलै नंतर लॉक डाऊन वाढवू नये. अन्यथा रस्त्यावर येऊन विरोध करू”.

प्रकाश आंबेडकर म्हणाले,”मी स्वतः कोविडची चाचणी करून घेतली आहे. राज्य सरकारने आमदार,खासदार,जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोक प्रतिनिधी यांची कोविड चाचणी करून घ्यावी. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. त्यांना शासनाने क्वारंटाईन करावं. मात्र ज्यांची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यांना फिरायला रान मोकळं करावं,” असंही ते म्हणाले.

मी उत्सुकतेपोटी कोरोना टेस्ट केली आहे. कोणी विचारलं तर प्रमाणपत्र दाखवता येतं, असंही ते मिश्किलपणे म्हणाले.

तसेच प्रकाश आंबेडकर यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया ला चांगलाच टोला लगावला आहे. ते म्हणाले ,”इलेक्ट्रॉनिक मीडिया हे लोकांच्या मनात भीती घालत आहे. आणि प्रिंट मीडिया लोकांना आशादायक बातम्या देत आहे. ”

न्युज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा