बीड, २६ ऑगस्ट २०२३ : पीकविमा योजनेच्या निकषानुसार एकवीस दिवस सलग पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देणे क्रमप्राप्त आहे. बीड मधिल उजनी मंडळात आजपर्यंत सलग २५ ते २७ दिवस पावसाने हजेरी लावली नाहीए. त्यामुळे मंडळातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीम मिळायला हवा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
बीड जिल्ह्यात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत. घाटनांदूरच्या पर्जन्यमान मापन यंत्रावर उजनी मंडळातील पावसाची चुकीची नोंद होत असल्याने उजनी मंडळातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीम रक्कम देण्यासाठी २१ दिवसाचा पावसाचा खंड नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आली आहे.
तालुका कृषी अधिकारी अंबाजोगाई, सूर्यकांत वडखेलकर यांनी याबाबत सांगितले की, सदरचे मंडळ पूर्वी ज्या मंडळात होते त्या मंडळाचा असलेल्या पर्जन्यमान मापन मंत्राचा डाटा वापर ला जातो. उदाहरणार्थ उजनी मंडळासाठी घाटनांदुर मंडळाचा डाटा व राडी मंडळासाठी बर्दापूरचा डाटा वापरला जातो. पण उजनी हे आता नव्याने महसूल मंडळ झाले आहे. पूर्वी घाटनांदूर मंडळ असल्याने पावसाची नोंद तेथेच होते, सध्या उजनी येथे पर्जन्यमान मापन बसविणे प्रस्तावित आहे, अशी माहिती माधुरी स्वामी, मंडळ अधिकारी, उजनी यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी