भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा तिसरा टप्पा लवकरच: आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली, १४ ऑक्टोंबर २०२०: कोरोना विषाणूच्या साथीच्या दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की भारत बायोटेकच्या कोरोना लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरू होईल. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत असेही म्हटले होते की ऑक्सफोर्ड लसीची चाचणीही तिसऱ्या टप्प्यात आहे. त्याचा निकाल नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत अपेक्षित आहे.

लस खरेदीसाठी देण्यात आलेल्या निधीशी संबंधित प्रश्नावर आरोग्य सचिव म्हणाले की, लसी तयार करणार्‍यांना प्री-क्लिनिकल चाचणीत मदत करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. इतर पर्यायांवरही विचार केला जात आहे. एकल डोस आणि डबल डोस लस अद्याप विकसित होत आहेत. कोरोनामधील मृत्यूचा संदर्भ देताना ते म्हणाले की यातील १० टक्के २६ ते ४४ वयोगटातील तरुण आहेत. याबाबत चिंता व्यक्त करताना राजेश भूषण म्हणाले की ३५ टक्के हे ४५ ते ६० वयोगटातील लोक आहेत.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव म्हणाले की कोरोनाचे ६२ लाख रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सकारात्मकतेचे प्रमाण ८.०७ टक्के आहे. कोरोनामध्ये सध्या देशात ९ लाखांपेक्षा कमी सक्रिय प्रकरणे आहेत. चाचणी मध्ये वाढ झाली आहे आणि सकारात्मकता दर खाली आला आहे असा दावा त्यांनी केला. एका दिवसात ११ लाख ३६ हजार चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशातील १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होणाऱ्या चाचण्यांचा दर, देशातील प्रति १० लाख चाचण्यांच्या हिशोबाने जास्त आहे. या राज्यांमधील सकारात्मकता दरही राष्ट्रीय सरासरीपेक्षा खाली आहे. दररोज नवीन प्रकरणांच्या बाबतीत केरळ देशात तिसर्‍या क्रमांकावर आहे. काही आठवड्यांपूर्वी केरळदेखील पहिल्या १० राज्यात नव्हतं. या यादीमध्ये महाराष्ट्र व कर्नाटक अव्वल दोन राज्ये आहेत. आरोग्य सचिव म्हणाले की, मंत्रालय या राज्यांच्या संपर्कात सतत आहे.

इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे डीजी बलराम भार्गव म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगात पुन्हा या विषाणूची लागण होण्याची २४ ते २५ प्रकरणे समोर आली आहेत. इथल्या काही लोकांना पुन्हा संसर्गही झाला आहे. त्यांनी सांगितलं की, जागतिक आरोग्य संघटनेने देखील अजून पुन्हा संक्रमण होण्याची व्याख्या निश्चित केलेले नाही परंतु शंभर दिवसानंतर विषणू पुन्हा शरीरामध्ये सक्रिय होतो. भार्गव म्हणाले की, ज्यांना बरे केले आहे त्यांच्याकडे सुमारे ४ महिने अँटीबॉडीज असतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा