जसप्रीत बुमराह होणार भारतीय कसोटी संघाचा 36 वा कर्णधार, कपिल देव यांच्यानंतर असं करणारा पहिला खेळाडू

मुंबई, 30 जून 2022: इंग्लंड दौऱ्यावर पोहोचलेल्या टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने कसोटी सामन्यातून बाहेर झालाय. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडं कमान सोपवण्यात आलीय. अशा प्रकारे बुमराहने इतिहास रचला आहे.

बुमराह हा भारतीय कसोटी संघाचा ३६वा कर्णधार असेल. तसेच, 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव नंतर तो पहिला वेगवान गोलंदाज असेल, जो टीम इंडियाचे नेतृत्व करेल. बुमराहसाठीही ही मोठी उपलब्धी आहे.

कपिल देव हे वेगवान गोलंदाज अष्टपैलू होते

कपिल देव हे वेगवान गोलंदाज अष्टपैलू होता, तर जसप्रीत बुमराह हा फक्त वेगवान गोलंदाज आहे. जरी तो चांगली फलंदाजी करत असला तरी बुमराहचे नाव अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत नाही. कपिलनंतर अनेक अष्टपैलू खेळाडूंनी कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवलं असलं तरी ते कपिल आणि बुमराहसारखा शुद्ध वेगवान गोलंदाज ठरले नाहीत.

या अष्टपैलू खेळाडूंमध्ये सौरव गांगुली आणि रवी शास्त्रीसारखी मोठी नावं आहेत. कपिल देव यांनी 1983 ते 1987 या काळात कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्यादरम्यान, त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 34 कसोटी सामने खेळले, ज्यात 4 जिंकले, 7 हरले आणि 22 अनिर्णित राहिले.

कपिल देव यांचा कसोटी कर्णधारपदाचा विक्रम

एकूण कसोटी सामने: 34
विजयी: 4
पराभूत: 7
अनिर्णित: 22

कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधाराबद्दल बोलायचं झालं तर त्यात विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांचं नाव येते. कोहली हा सर्वाधिक 68 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार असलेला भारतीय आहे. यासोबतच कोहली सर्वाधिक 40 कसोटी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे.

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

• विराट कोहली – 68 कसोटी – 40 विजय – 17 पराभूत
• महेंद्रसिंग धोनी – 60 कसोटी – 27 विजय – 18 पराभूत
• सौरव गांगुली – 49 कसोटी – 21 विजय – 13 पराभूत

कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ:

जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा