पत्रकार दानिशला गोळ्या घातल्या आणि नंतर गाडीने चिरडले डोके, धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली, २१ जुलै २०२१: पुलित्झर पुरस्कार विजेते छायाचित्रकार पत्रकार दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूचे कारण आतापर्यंत अफगाण सैन्य आणि तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात गोळ्या लागल्याचं सांगितल जात आहे. त्याच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण म्हणून गोळ्यांचा उल्लेखही आहे. पण आता जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे. तालिबानी दहशतवाद्यांनीच दानिशवर गोळीबार केला, इतकेच नव्हे तर कारने त्याच्या डोक्यालाही चिरडले.

अफगाण सैन्याचे कमांडर बिलाल अहमद यांनी भयानक सत्य सांगितले आहे. तालिबान्यांनी दानिशच्या मृतदेहाची किती प्रमाणात विटंबना केली हे त्यांनी सांगितलं. अफगाण कमांडरने सांगितले की दानिशच्या मृतदेह बरोबर तालिबान्यांनी अशी विटंबना केली कारण दानिश भारतीय होते आणि तालिबान भारताचा द्वेष करतात.

दानिश सिद्दीकी यांचे १६ जुलै रोजी निधन झाले. आतापर्यंत अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात झालेल्या चकमकीत ते ठार झाल्याचे त्याच्या मृत्यूबद्दल सांगण्यात येत होते. अफगाण सैन्याने जेव्हा पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या स्पिन बोल्दक शहरावरील बाजारपेठेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा तालिबानशी सामना झाला आणि एका अफगाण अधिकाऱ्यांसह दानिश सिद्दीकी मारला गेला.

पण, आता जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे. बिलाल अहमद गेली ५ वर्षे अफगाण सैन्यात आहेत आणि सध्या कमांडर पदावर कार्यरत आहे. त्यांनी सांगितले की, तालिबान्यांनी प्रथम दानिश सिद्दीकीवर गोळ्या झाडल्या ज्यायोगे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर, जेव्हा तालिबान्यांना समजले की तो एक भारतीय आहे, तेव्हा त्यांनी त्याच्या डोक्यावर कार चढविली. तो मरण पावला हे तालिबानला चांगले ठाऊक होते. पण तालिबान्यांना भारत आणि भारतीयांचा द्वेष आहे, म्हणूनच त्यांनी दानिशच्या शरीरावर शरीरा बरोबर इतकी विटंबना केली.

अफगाण सैन्याच्या कमांडरच्या या खुलाष्या मुळे तालिबान भारताचा किती द्वेष करतो आणि पाकिस्तान तसेच त्याची गुप्तचर संस्था आयएसआय त्याचा फायदा घेत आहे. तालिबानच्या मदतीने पाकिस्तान अफगाणिस्तानमधील भारतीय मालमत्तांना लक्ष्य करीत आहे, भारताने केलेल्या गुंतवणुकीची तोडफोड करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा