शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

सोलापुर, १ नोव्हेंबर २०२२: प्राथमिक शाळेच्या मान्यतेसाठी ५० हजार रुपयांची मागणी करीत कार्यालयातच २५ हजार रुपयांची लाच घेणारा सोलापुर जिल्हा परिषदेचा शिक्षणाधिकारी किरण लोहार याला लाचलुचपत विभागाने सोमवारी रात्री रंगेहाथ पकडलं.

शिक्षणाधिकारी लोहार याला अटक केली असून, त्याच्या कार्यालयातील कनिष्ठ सहायक अल्ताफ पटेल या लिपिकालाही ताब्यात घेतलंय. या प्रकरणी तक्रारदाराची सोलापुर तालुक्यातील कोंडी येथे प्राथमिक शाळा आहे. या शाळेतील पाचवी ते आठवी वर्ग वाढवण्यासाठी परवानगी मागणी त्यांनी किरण लोहार याच्याकडे केली होती.

शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना रविवारी भिलार येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व उत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई याच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता आणि दुसऱ्याच दिवशी लोहार यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. यामुळं पुरस्कार मिळालेल्या अधिकाऱ्याच्या हातात दुसऱ्याच दिवशी बेड्या पडल्याबाबत पुर्ण तालुक्यात चर्चा सूरु होती.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा