कुरुंदवाड, १७ ऑगस्ट २०२३ : कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज अनिल फडणवीस यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार कोल्हापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक देऊन बहाल करण्यात आला. कुरुंदवाड पोलीस ठाण्यात राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे ते एकमेव अधिकारी आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरज गांधीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एमआयडीसीतील मिलींद केमिकल कारखान्याला आग लागली होती. या आगीत अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने दखल घेत २६ जानेवारी २०२३ रोजी केंद्र सरकारचा उत्तम जीवन रक्षा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यातून एकमेव पदक बहाल करून त्यांचा सन्मान केला आहे. रविराज फडणवीस यांच्या कर्तव्यदक्ष पोलिससेवेची शासनाच्या गृह विभागाने दखल घेऊन त्यांना १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर