नवी दिल्ली, ३ जुलै २०२३ : सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोबाईल कंपन्या विविध वैशिष्टयांसह स्मार्टफोन बाजारात आणत असतात, त्यातच मोटोरोला कंपनी देखील त्यांचे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च करत आहे. मोटोरोला कंपनी आज भारतात नवीन स्मार्टफोन मोटोरोला रझर Razr 40 Series लाँच करणार आहे. यामध्ये Motorola Razr 40 आणि 40 Ultra हे दोन नवे स्मार्टफोन असणार आहेत. हे जगातील सर्वात स्लिम-फ्लिप फोन असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. मोटोरोलाचे Razr 40 आणि Razr 40 Ultra हे जून सुरुवातीला चीनमध्ये लॉन्च करण्यात आले होते. Motorola Razr 40 Series मधील दोन्ही स्मार्टफोन तुम्हाला, ऑन लाईन खरेदी करता येणार आहे.
Motorola Razr 40
या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7 Gen 1 SoC, 8 GB रॅम, 256GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे तर यामध्ये ६४MP प्रायमरी कॅमेरा आणि 13MP कॅमेरा आणि अल्ट्रावाइड सेन्सर उपलब्ध असुन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२MP फ्रंट कॅमेरा आहे. ६.९ -इंच इनर FHD+ AMOLED डिस्प्ले आणि १.९ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. Motorola Razr 40 स्मार्ट फोनची किंमत ५९,९९९ रुपयांपासून सुरू होईल. याचे बेस मॉडेल ग्रे, चेरी पावडर आणि ब्राइट मून व्हाइट कलरमध्ये खरेदी करू शकता. तसेच Motorola Razr 40 Ultra मॉडेल तुम्हाला Fengya Black, Ice Crystal Blue आणि Magenta रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.
Motorola Razr 40 Ultra
या स्मार्टफोनमध्ये 144hz च्या रीफ्रेश रेटसह ३.६-इंचाचा OLED कव्हर डिस्प्ले, 165hz च्या रीफ्रेश दरासह ६.९ -इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८+ Gen १ चिपसेट आणि ३८०० mAh बॅटरी असेल. तसेच ३०W फास्ट चार्जिंग असेल. स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्यामध्ये १२MP मेन कॅमेरा आणि 13MP अल्ट्रावाइड सेन्सर असेल. त्यासोबतच ३२ MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल. Motorola Razr 40 Ultra फोनची किंमत सुमारे ८०,००० रुपये असू शकते. पण मोटोरोला अल्ट्रा मॉडेलची किंमत अद्यापही सांगितलं नाही.
अलीकडेच कंपनीने देशात Motorola Edge 40 लॉन्च केला होता. युरोप, मध्य पूर्व, लॅटिन अमेरिका आणि एशिया पॅसिफिकमधील काही देशांमध्ये Motorola Razr 40 हा स्मार्टफोन आधीच सादर करण्यात आला आहे. Motorola Razr 40 हा स्मार्टफोन Motorola Edge 30 ची जागा घेण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे