सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर २६ फेब्रुवारी २०२४ : सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने सिल्लोड येथे साकारण्यात आलेल्या भगवान महावीर स्तंभ आणि प्रवेशद्वाराचे लोकार्पण त्यासोबतच शांतिगिरी आर्यनंदी स्मारक, महाराजा अग्रसेन स्तंभ, श्री कुंथुनाथ भगवान श्वेतांबर जैन मंदिर अहिंसा द्वार, आणि श्री श्री १००८ सुंदरदासजी महाराज खंडेलवाल चौक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भगवान महावीर स्तंभ येथे आयोजित सभेला मान्यवरांनी संबोधित केले.
या कार्यक्रमास मधुर गायक प.पु. शालीभद्रमुनीजी म सा, प्रज्ञा मनिषि प.पु प्रणवमुनीजी म.सा यांच्यासह वैजापूरचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन पा. गाढे, जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्याकारणी सदस्य गौतम संचेती, सकल मारवाडी महासभेचे कार्याध्यक्ष महावीर पाटणी, महावीर जैन गोशाळाचे अध्यक्ष मनोज बोरा, सकल राजस्थानी समाज सिल्लोड चे अध्यक्ष विनोद मंडलेचा, मुकुंद वालचाळे, सोमनाथ तांबी, धरमचंद मंडलेचा, अनिल लोहाडे, रमेश लाठी, पद्माकर गोसावी, सुदर्शन अग्रवाल, मुकेश खंडेलवाल तसेच केशवराव तायडे, अब्दुल आमेर, प्रभाकर काळे, श्रीराम महाजन, देविदास पा लोखंडे, राजेंद्र ठोंबरे, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, दीपाली भवर , मेघा शाह, किशोर अग्रवाल, रऊत बागवान, मनोज झंवर, राधेश्याम गुप्ता, सुभाष जैन, सुनील पाटणी, राजाराम पाडळे, विश्वास दाभाडे,, अनिल बोरा, विठ्ठल सपकाळ, नरसिंग चव्हाण, जयराम चिंचपुरे, दारासिंग चव्हाण, नाना पा रहाटे, सुधाकर पाटील, दामूअण्णा गव्हाणे, शांतीलाल अग्रवाल, दुर्गेश जैस्वाल,घनश्याम वर्मा, संदीप राऊत, सुनील पगारीया, ,डॉ मच्छिद्र पाखरे, भावराव लोखंडे, डॉ चोरडिया, सुशील जैन , बबलू पठाण, विशाल जाधव, आत्माराम अग्रवाल, संजय पांडे, पंजाबराव चव्हाण, सुशील ओस्तवाल, गोविंद लाठी आदिंसह सकल राजस्थानी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सचिन साबळे