धुळे २८ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने धुळ्यात सकल मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने समाजातील लोक जमा झाले आणि त्यांनी जवळपास क्विंटल भर गुलाल उधळून, मोठ्याने फटाके फोडून, एकमेकांना मिठी मारून आणि महामानवाचे पोस्टर दाखवून आनंदोत्सव साजरा केला.
मराठा आरक्षणाची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी मनोज जरंगे पाटलांकडे दिली आणि धुळ्यात एकाच जल्लोष झाला. गुलालाची आंघोळ करणाऱ्या मराठा समाजातील सदस्यांना नाचण्याचा मोह आवरता आला नाही. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जल्लोषाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या स्मारकाजवळचा परिसर गुलालाने माखला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : भाग्यश्री बागुल