मीराबाई चानूने भारताला मिळवून दिले सुवर्ण, सलग दोनदा भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम

Commonwealth Games 2022, ३१ जुलै २०२२: भारतीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यावेळी तिने ४९ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. मीराबाई चानूने गोल्ड कोस्टमध्ये (२०१८) गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी ४८ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि यावेळीही तिने सलग दोनदा भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याचवेळी तिने राष्ट्रकुल स्पर्धेत हॅट्ट्रिक साधली. तिने २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले, त्यानंतर २०१८ आणि २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकले.

मीराबाईने सुवर्णपदक पटकावले

४९ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीराबाई चानूने स्नॅच फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात ८४ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ठरली. दुसऱ्या प्रयत्नात तिने ८८ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्यातही ती यशस्वी झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिचा हा सर्वोत्तम प्रयत्न होता आणि तिने नवा विक्रम केला. तिसऱ्यांदा तिने ९० किलो वजन उचलण्याचे आव्हान स्वीकारले आणि त्यात ती यशस्वी झाली. तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये आपल्या वजन गटात ८८ किलो वजन उचलून नवा विक्रमही केला. स्नॅच राऊंडमध्ये ती १७२ किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरली.

क्लीन अँड जर्क फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात मीराबाईने १०९ किलो वजन उचलून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दुसऱ्या प्रयत्नात तिने ११३ किलो वजन सहज उचलले, तर तिसऱ्या प्रयत्नात ११५ किलो वजन उचलण्यात तिला यश आले नाही. क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये तिने २२२ किलो वजन उचलून नवा विक्रम रचला आणि इतिहास रचला. ती गेल्या वेळी सुवर्णपदक विजेती होती आणि ती राखण्यात यशस्वी ठरली. या स्पर्धेत तिने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण २०१ किलो वजन उचलले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा