मुंढवा जॅकवेलमधून मैलामिश्रित पाणी

पुणे: मुंढवा येथील जॅकवेलमधून साडेसतरा नळी हडपसर येथील बेबी कॅनालमध्ये मैलापाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांना या ठिकाणी दि.१९ जुलै रोजी प्रत्यक्ष परिस्थिती दाखवली होती. त्यावेळी त्यांनी उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले होते.
त्याला आता ५ महिने होऊन गेले आहेत तरी मनपाकडून कसलीच कारवाई केली गेली नाही. त्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे.

या मैलायुक्त पाण्यामुळे बेबी कॅनालच्या दोन्ही बाजूंना राहणारे हजारो नागरिक दुर्गधी, रोगराई, डास यांमुळे त्रस्त झाली आहेत.
कॅनालच्या दोन्ही बाजूंकडील विहिरींचे व बोअरवेलचे पाणीही दूषित झाले आहे. आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून साडेसतरा नळी, महादेवनगर, लक्ष्मी काॅलणी, फुरसुंगी, शेवाळेवाडी येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. तरी पालिका प्राशसनाने या पाण्याबाबत योग्य निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ससाणे यांनी केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा