महागाईप्रश्नी राष्ट्रवादी काॅंग्रेस काढणार महामोर्चा

सांगली, ५ मार्च २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसची शहर काँग्रेसच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात वाढत्या महागाईबाबत चर्चा करून केंद्राचा निषेध करण्यात आला. त्या संदर्भात महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक तास आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी, तरुण, पुरोगामी विचारांसाठी संकल्पना मांडली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली शहर, जिल्ह्याच्या वतीने कार्यालयात बैठक झाली. त्यात वाढत चाललेल्या महागाईबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. प्रभागांतील नागरिकांच्या समस्यांबाबत प्रत्येक प्रभागाचा आढावा घेण्यात आला. ‘राष्ट्रवादी’चे कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे, नगरसेवक हरीदास पाटील, उत्तम कांबळे, ज्योती आदाटे, युवराज गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बजाज म्हणाले, की नागपूरप्रमाणे कसबा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे हवा आता बदलत आहे. राष्ट्रवादी घराघरांपर्यंत पोचवा. लोकांच्या समस्या ऐकून घ्या. त्यांना मदत करा व त्यांच्या आडचणी दूर करा, असे ‘राष्ट्रवादी’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा