राजस्थान प्ले-ऑफच्या जवळ, लखनौ सुपर जायंट्सचा 24 धावांनी केला पराभव, दोन्ही संघांचे 16-16 गुण

RR vs LSG, 16 मे 2022: आयपीएल 2022 मध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 24 धावांनी पराभव केला. या निकालामुळे राजस्थानची प्ले-ऑफमध्ये जाण्याची शक्यता दाट झाली आहे. 13 सामन्यांत त्यांचे 16 गुण आहेत. लखनौचेही 13 सामन्यांत 16 गुण आहेत. चांगल्या रन रेटमुळे, RR आता पॉइंट टेबलमध्ये नंबर-2 वर पोहोचला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 6 गडी गमावून 178 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात लखनौचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 154 धावाच करू शकला. दीपक हुडाने सर्वाधिक 59 धावा केल्या. ट्रेंट बोल्ट, प्रशांत कृष्णा आणि ओबेड मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. बोल्टने फलंदाजीतही हात दाखवत 9 चेंडूत 17 धावा केल्या होत्या.

जैस्वाल आणि संजू यांच्यात अर्धशतकी भागीदारी
राजस्थानची सुरुवात खूपच खराब झाली आणि स्टार फलंदाज जोस बटलर 6 चेंडूत 2 धावा करून आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसनने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. दोघांनी 64 धावा जोडल्या. एलएसजीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या जोडीला जेसन होल्डरने वेगळे केले. त्याने सॅमसनला दीपक हुड्डाकरवी झेलबाद केले. सॅमसनने आपल्या डावात 24 चेंडूंचा सामना केला आणि 6 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या.

आयुष बडोनीच्या चेंडूवर जैस्वाल 41 धावा करून बाद झाला. त्याने 29 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार मारला. जयस्वालने पडिक्कलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 26 धावा जोडल्या.

अश्विन आणि बोल्टने नेले 170 च्या पार

खालच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी छोट्या पण उपयुक्त खेळी खेळून राजस्थानला 170 धावांपर्यंत मजल मारली. रायन परागने 19 आणि जिमी नीशमने 14 धावा केल्या. रविचंद्रन अश्विन (10) आणि ट्रेंट बोल्ट यांनी सातव्या विकेटच्या भागीदारीत 26 धावा जोडून संघाला 178 धावांपर्यंत नेले. बोल्टने 9 चेंडूत 17 धावा केल्या. अश्विनने 7 चेंडूत 10 धावा केल्या.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

राजस्थानः जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जेम्स नीशम, रायन पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रणंद कृष्णा, युझवेंद्र चहल आणि ओबेद मॅककॉय.

लखनौ: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, मोहसिन खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमिरा आणि आवेश खान.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा