तामिळनाडूच्या ४ जिल्ह्यांमध्ये एनआयएचे छापे, पीएफआय चे प्रादेशिक प्रमुख ताब्यात

तामिळनाडू, ९ मे २०२३: राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) आज तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी छापे टाकले आहेत. हे छापे आता प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संदर्भात केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कोईम्बतूर, मदुराई, थेनी या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय चेन्नई, ओटेरी आणि थिरुवोट्टीयुर येथेही छापे टाकण्यात येत आहेत.

दरम्यान, प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे मदुराई क्षेत्रीय अध्यक्ष मोहम्मद कैसर यांना एनआयएने ताब्यात घेतले. एनआयएने त्यांला तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील पझानी येथून ताब्यात घेतले.

जम्मू-काश्मीरमध्येही असे छापे टाकले जात आहेत. टेरर फंडिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत. एनआयए अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. यामध्ये श्रीनगर, अनंतनाग, पुंछ, राजौरी आणि किश्तवाड यांचाही समावेश आहे. हे प्रकरण बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये बॉम्ब, आयईडी आणि लहान शस्त्रे वापरून हिंसक दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी भौतिक आणि सायबर स्पेसमध्ये कट रचण्याशी संबंधित आहे. यापूर्वीही एनआयएने एप्रिलमध्ये पीएफआयएशी संबंधित १७ ठिकाणी छापे टाकले होते.

एनआयएने बिहार, यूपी, पंजाब आणि गोव्यासह १७ ठिकाणी छापे टाकले. याशिवाय २ मे रोजी जम्मू-काश्मीरमधील ६ जिल्ह्यांमध्ये १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. टेरर फंडिंग प्रकरणातही हा छापा टाकण्यात आला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा